‘तुंबणं’ हा जसा मुंबईचा ‘स्वभाव’ झाला आहे, त्याचप्रमाणे समस्यांच्या मुळापर्यंत न जाता त्यांचं सुलभीकरण करणं, ही आपली ‘सवय’ झाली आहे!
पावसाळ्यात वारंवार तुंबणं ही ‘समस्या’ असण्यापेक्षा तो मुंबईचा ‘स्वभाव’च झाला आहे. असं झालं की, समस्येचं मूळ आणि त्यावरचा उपाय शोधणं दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत जातं. मग काहीतरी करायला हवं म्हणून काही गोष्टी त्यांची वास्तविकता, उपयुक्तता आणि परिणामकारकता न तपासता केल्या जातात. त्यामुळे समस्या जागेवरच राहतात किंवा वाढतात. शिवाय त्या अविचारी उपायांचं ओझं आपल्या माथ्यावर येऊन बसतं.......